क्रीडा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं; जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळं अखेरच्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. १५ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वीच बुमराहाला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत नाही. भारतात होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करुन चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहाला आराम देण्यात येणार आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करणार आहे. त्यासोबत नवदीप सैनीही असणार आहे. बुमराहच्या जागी नटराजनला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर तर बुमराहच्या जागी नटराजनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago