महाराष्ट्र

राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे.

रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे ते उमेदवार होते. शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वडोदा ग्रामपंचायतीतील संबंधित जागेसाठी मतदान होणार की रद्द करावे लागणार, यासाठी तहसील विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago