क्रीडा

IND vs USA : अमेरिकेचं आव्हान पार करत सुपर ८ मध्ये आगेकूच, अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या २५व्या सामन्यात यजमान अमेरिका आणि भारत यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यजमान अमेरिकेवर ७ विकेट्सनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. त्याचबरोबर भारत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्याात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीपच्या शानदार कामगिरीच्या (४ विकेट्स) जोरावर अमेरिकेला ११० धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार आणि शिवमने भारताला १८.२ षटकांत विजय मिळवून दिला.

सुरुवातीच्या धक्क्यातून सावरलेल्या भारतीय संघाने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर टी-२० विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यात अमेरिकेचा सात गडी राखून पराभव करून सुपर एट टप्प्यासाठी पात्र ठरले आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने २० षटकांत आठ गडी गमावून ११० धावा केल्या. प्रत्युत्तरात सौरभ नेत्रावळकरने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले, पण सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावून संघाला सावरले आणि दुसऱ्या टोकाला शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून ११ धावा करून विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय असून त्याने सहा गुण घेत सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून अमेरिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले परंतु वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात अमेरिकेला दुहेरी धक्का दिला. ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक २७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवातही चांगली झाली नाही आणि विराट कोहलीच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. कोहली खाते न उघडताच बाद झाला. यानंतर सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एकेकाळी संघ संकटात सापडलेला दिसत होता, पण सूर्यकुमार आणि शिवमने जबाबदारी सांभाळली आणि भारताला विजयापर्यंत नेले. सूर्यकुमार यादव ४९ चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा करून नाबाद राहिला तर शिवम दुबे ३५ चेंडूंत एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा करून नाबाद राहिला.

टीम इंडियाने अमेरिकेविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी न्यूयॉर्कची खेळपट्टी वरदान ठरली. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर अमेरिकेचा फलंदाज शायान जहांगीरला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवत ऐतिहासिक कामगिरी केली. तो टी-२० विश्वचषकात भारतासाठी सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने आपल्या ४ षटकात केवळ ९ धावा देत ४ विकेट्स घेत अनेक विक्रम केले. त्याचवेळी हार्दिक पंड्यानेही दोन विकेट्, घेतल्या. अशा प्रकारे भारताने अमेरिकन संघाला ११० धावांवर रोखले.

सुपर ८ मध्ये जाण्यासाठी पाकिस्तान संघासाठी अमेरिकेला भारताकडून हरावे असे समीकरण होते. भारतीय संघाने यजमान अमेरिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या सुपर ८ मध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पाकिस्तान संघाला पुढच्या टप्प्यात जायचे असेल तर आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच, अमेरिकेला त्याच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम
Tags: 2024 25th MatchArshdeep Singh sets new record in T20 World CupGroup A 2024Group A in New YorkIND vs USA ScoreIndia beat USA by 7 wicketsIndia enters Super 8 of T20 World CupIndia vs USAIndia vs USA match updatesIndia vs USA ScoreIndia vs USA t20 match in IndiaIndia vs USA t20 match updates in MarathiIndia vs USA t20 World Cup 2024Nassau County International Cricket Stadium New YorkRecord of first ball wickets in T20 World Cup matchT20 World Cup 2024 Match Updatest20 World Cup June 12U.S.A. vs India 25th Match LiveUnited States of America vs India Updates in MarathiUSA vs IND score in Marathiअर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषक रचला नवा विक्रमइंडिया वि यूएसए स्कोअरटी-२० विश्वचषक सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रमनासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कभारत टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये दाखलभारत वि अमेरिकाभारत वि अमेरिका टी२० वर्ल्ड कप २०२४ मॅच अपडेटभारत वि अमेरिका स्कोअरभारत विरुद्ध अमेरिका टी२० वर्ल्ड कप २०२४भारत विरुद्ध अमेरिका मॅच अपडेटभारत विरुद्ध यूएसए टी२० मॅच अपडेट्सभारताचा अमेरिकेवर ७ विकेट्सी विजययुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वि भारत अपडेट्ससूर्यकुमार यादवचे अर्धशतकसूर्यकुमार शिवमचे अर्धशतकी भागीदारी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago