क्रीडा

Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक

पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे देण्यात आले. भारतीय संघात श्रेयस अय्यर जखमी असल्यामुळे ऋषभ पंतला संधी दिली. भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. शिखर फक्त ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. परंतु, विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने फक्त २८ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने वनडेतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने ११४ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ११४ धावा केल्या. पंत ४० चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. त्याने ७ षटकार आणि ३ चौकार मारले.

दरम्यान विराटने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत सर्वात कमी डावात १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago