Former ICC umpire Asad Rauf passes away at 66
पाकिस्तान : 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भूमिका बजावणारे माजी ICC अंपायर असद रौफ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असद रौफ त्यांच्या काळातील सर्वोत्तम पंचांपैकी एक होते. 2006 मध्ये त्यांनी पहिल्या कसोटीत काम केल्यानंतर वर्षभरात ICC एलिट पॅनेलमध्ये सामील झाले.
कामरान अकमलने ट्विट करत म्हटले कि, आयसीसीचे माजी अंपायर असद रौफ यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल जाणून वाईट वाटले.
क्रिकेट सामन्यांमध्ये स्पॉट-फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे रौफ यांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आणि फेब्रुवारी 2016 मध्ये भ्रष्टाचारात दोषी आढळल्यानंतर त्यांना पाच वर्षांची निलंबनाची शिक्षा मिळाली. परिणामी, आयपीएल हंगाम संपण्यापूर्वी रौफ यांनी भारत सोडला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतली. सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर रौफ यांना आयसीसीच्या एलिट पॅनेलमधून वगळण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोणतेही ठोस कारण देण्याचे टाळले आणि स्पष्ट केले की त्यांनी आयपीएल फिक्सिंग प्रकरणामुळे रौफ यांना वगळले नाही. त्यांनी अंपायरिंग कारकीर्द सुरु करण्यापूर्वी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून प्रथम श्रेणी कारकीर्द केली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…