ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
युक्रेन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की गुरुवारी पहाटे युद्ध क्षेत्राला भेट देऊन राजधानी कीवला परतत असताना त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. सुदैवाने, या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. झेलेन्स्की यांचे प्रवक्ते, सेर्गी निकिफोरोव्ह यांनी सांगितले की, झेलेन्स्की खार्किव प्रदेशातून कीवला परतत होते, जिथे ते इझियम शहरात त्या युक्रेनियन सैनिकांना भेटण्यासाठी आले होते, ज्यांची रशियन सैन्याकडून सुटका करण्यात आली होती.
फेसबुक पोस्टमध्ये, निकिफोरोव्ह म्हणाले की कीवमध्ये एक प्रवासी वाहनाची राष्ट्रपतींच्या ताफ्याला धडक झाली. ते म्हणाले की झेलेन्स्की यांच्या वैद्यकीय पथकाने प्रवासी वाहनाच्या चालकावर प्राथमिक उपचार केले, त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. वाहतूक अपघात नेमका कधी झाला हे त्यांनी स्पष्ट केले नाही. निकिफोरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय पथकाने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची तपासणी केली असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. निकिफोरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताची कारणे आणि परिस्थिती तपासली जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…