क्रीडा

वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 33 वर्षांचा होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या गोलंदाजीच्या खास शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत.

भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट करत म्हटलं कि, “अश्विन यादवच्या जाण्याने मी खूप दुखी झालो आहे, मला मोठा धक्का बसला आहे, एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेला. तो ‘टीम मॅन’ होता. मी देवाकडे प्रार्थना करतो ती ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबाला द्यावी. क्रिकेटमध्ये नक्कीच अश्विनची कमी भासेल. ओम शांती”

अश्विन यादवने 2007 मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणारा यादवने 14 प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 34 बळी घेतले. 2008-09 च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत 52 धावा देऊन 06 बळी घेतले. अश्विनने शेवटचा रणजी सामना 2009 मध्ये मुंबई विरुद्ध खेळला. मात्र स्थानिक लीगमध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद व त्यानंतर एसबीआयकडून खेळणे त्याने सुरुच ठेवले. तो हैदराबादकडून 10 सामने आणि 2 टी-20 सामने खेळला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago