क्रीडा

धोनीने चेन्नईच्या यशात प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल मानले आभार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या.

गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. वॉटसनने नाबाद ८३ तर डु-प्लेसिसने नाबाद ८७ धावांची खेळी केली. याव्यतिरीक्त चेन्नईच्या गोलंदाजांनीही अखेरच्या षटकांत दमदार पुनरागमन करत पंजाबला १७८ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. चेन्नईच्या दृष्टीकोनातून पंजाबविरुद्धचा सामना हा खूप आश्वासक ठरला.

“खडतर काळातही खेळाडूंना पाठींबा देत राहणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. मला असं अनेकदा वाटतं की चेन्नईच्या यशात स्टिफन फ्लेमिंगला म्हणावं तितकं श्रेय मिळत नाही. ज्यावेळी प्रशिक्षकाच्या डोक्यात वेगळी रणनिती असते आणि कर्णधार काहीतरी वेगळा विचार करत असतो तेव्हा दोघांचा मेळ घालणं खूप कठीण असतं. अनेकदा यामुळे संभ्रमही निर्माण होतो. पण चांगली गोष्ट म्हणजे आमच्यात जे काही ठरतं ते आम्ही ड्रेसिंग रुमबाहेर जाऊ देत नाही. मैदानावर आलो की आमचा एकमेकांना पाठींबा असतो. आमच्यात कधी मतभेद होत नाहीत अशातला भाग नाही, पण ते आमच्या दोघांपुरते आणि क्षणिक असतात. गेले अनेक हंगाम स्टिफन आमच्यासोबत काम करतोय.” अशा शब्दात सामना संपल्यानंतर धोनीने प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल आभार मानले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago