क्रीडा

आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका

आयपीएलचे सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा भारत सरकारच्या परवानगीनं आता १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.

मात्र आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी या याचिकेतून केली गेली आहे. पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

आयपीएल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावजलेली एक मोठी स्पर्धा असल्यानं हे देशासाठी उत्पन्न मिळण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या दरम्यान देशातील अनेक उद्योगांना चालना मिळत असते. मागील वर्षी आयपीएलचं ब्रॅण्ड मूल्य हे 475 अब्ज कोटी इतकं होतं. आयपीएल हे बीसीसीआयच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुळे हे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेऊ नयेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago