क्रीडा

‘दंगल गर्ल’ गीता फोगटची बहिण रितिका फोगटची आत्महत्या

भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट आणि गीता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली. रितिका १७ वर्षांची होती. भरतपूर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचून रितिकाने आत्महत्या केली. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील दंगल गर्ल गीता फोगटच्या कुटुंबाचा भाग होती.

रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. स्पर्धेदरम्यान ते देखील उपस्थित होते. रितिका कुस्तीपटू महावीर फोगट स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. ती 53 किलो गटात खेळत होती. यापूर्वी तिने राज्यस्तरीय स्पर्धेत 4 वेळा भाग घेतला होता.

रितिकाने १२ ते 14 मार्च दरम्यान भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. १४ मार्चला झालेल्या अंतिम सामन्यात फक्ता एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. या पराभवामुळे ती खचून गेली होती. १5 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास पंख्याला स्कार्फ लावून गळफास घेत तिने आत्महत्या केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago