क्रीडा

अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

रैनानं आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,६१५ धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा आणि १३ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये १,६०५ धावा केल्या आहेत.

गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे धोनी प्रमाणे रैनाचा देखील चांगली कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर इरफान पठाणशी बोलताना रैनाने चांगली कामगिरी करून देखील निवड समितीने दखल घेतली नाही, अशी खंत बोलून दाखवली होती.

धोनीला टॅग करत रैनाने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली व म्हणाला की, तुझ्या सोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. निवृत्तीच्या तुझ्या या प्रवासात मी देखील सहभागी होत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद!

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago