राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर,आमदार आशिष जायस्वाल, आमदार कृष्णा खोपडे आमदार विकास कुंभारे,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते. मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago