अमरावती

बच्चू कडू यांना 17 वर्षांपुर्वी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड

अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. या प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सोमवारी कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. बैठक सुरू असतानाच आमदार कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मटकी फोडो’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आमदार कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ४ जुलै रोजी निर्णय देताना बच्चू कडू यांना वेगवेगळ्या कलमान्वये एकूण २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अ‌ॅड. सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago