राजकारण

कोरोना प्रसार वाढण्यास केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार- जयंत पाटील

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी काही दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. जेणेकरुन सर्व व्यवस्था उभारण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला असता.

स्थलांतरितांचे हाल झाले नसते आणि कोरोनाचा संसर्ग न घेता लोक आपआपल्या निश्चित स्थळी पोहोचले असते. मात्र नोटबंदीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला. मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर मुंबई, पुण्यातील किंवा शहरी भागातून लोक पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपआपल्या गावी पोहोचले आणि सोबत कोरोनाही घेऊन गेले, त्यामुळे ग्रामीण भागात आज परिस्थिती बिघडत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago