Former MP Dr. Sunil Baliram Gaikwad awarded "National Corona Warrior Award"
लातूर : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना २०२१ चा डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवी दिल्ली चा “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार मिळाला आहे.
कोरोनाच्या काळात अनेक गरजू गरीब लोकांची, तसेच मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांची कोरोनाच्या काळात दयनीय परिस्थिती झाली होती. त्यावेळी अनेकांना आर्थिक आणि अन्न धान्याची मदत वत्सला बळीराम सेवा भावी संस्था आणि बळीराम गायकवाड फाउंडेशन च्या वतीने माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केली. लातूर लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणत मास्क आणि आणि सॅनिटायझरचे वाटप करून भटके विमुक्त समाज आणि दलीत समाजातील गरजू लोकांना अन्न धान्य किटचे वाटप केले.
कोरोना काळातील अशा अनेक कामांची, मदतीची दखल घेऊन दिल्लीच्या डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने, केंद्रीय भटके विमुक्त अभ्यास आयोगाचे अध्यक्ष दादा भिकू रामजी इदाते, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, डॉ. मनीष गवई या मान्यवरांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देऊन प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…