राजकारण

मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकून पहिलं स्थान मिळवलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ आणि शिवसेना शिंदे गटाला ५७ जागांवर विजय मिळाला. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रचंड उत्सुकता होती, कारण कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, नव्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली.

यावेळी मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांचं नावही यादीत नाही. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान नाही.

नव्या मंत्र्यांची यादी:
भाजप:

– चंद्रशेखर बावनकुळे
– राधाकृष्ण विखे पाटील
– चंद्रकांत पाटील
– गिरीश महाजन
– गणेश नाईक
– मंगलप्रभात लोढा
– जयकुमार रावल
– पंकजा मुंडे
– अतुल सावे
– अशोक उईके
– आशिष शेलार
– संजय सावकारे
– नितेश राणे
– आकाश फुंडकर
– माधुरी मिसाळ – राज्यमंत्री
– पंकज भोयर – राज्यमंत्री
– मेघना बोर्डीकर – राज्यमंत्री
– शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवसेना:
– गुलाबराव पाटील
– दादा भुसे
– संजय राठोड
– उदय सामंत
– शंभूराज देसाई
– संजय शिरसाट
– प्रताप सरनाईक
– भरत गोगावले
– प्रकाश आबिटकर
– आशीष जैस्वाल – राज्यमंत्री
– योगेश कदम – राज्यमंत्री

राष्ट्रवादी:
– हसन मुश्रीफ
– धनंजय मुंडे
– दत्तात्रय भरणे
– आदिती तटकरे
– माणिकराव कोकाटे
– नरहरी झिरवळ
– मकरंद जाधव
– बाबासाहेब पाटील
– इद्रनील नाईक

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम
Tags: Ajit PawarBJPBJP Cabinetcabinet expansionCabinet Expansion 2024Cabinet Expansion December 5Cabinet ReshuffleChhagan BhujbalDeepak KesarkarElection VictoryMaharashtra CabinetMaharashtra Cabinet Expansionmaharashtra electionmaharashtra governmentMaharashtra Ministersmaharashtra politicsMinisterial AppointmentsMinisters ListncpNCP Ajit Pawar FactionNew MinistersNew Ministers Oath CeremonyOath Ceremonypankaja mundePolitical Changespolitical newsShinde Factionshiv senaShiv Sena Shinde FactionState CabinetState Politicsअजित पवारछगन भुजबळदीपक केसरकरनव्या मंत्र्यांचा शपथविधीपंकजा मुंडेभाजपभाजप मंत्रिमंडळमंत्रिमंडळ फेरबदलमंत्रिमंडळ विस्तार 2024मंत्रिमंडळ विस्तार 5 डिसेंबरमंत्री नियुक्तीमंत्र्यांची यादीमहाराष्ट्र निवडणूकमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र सरकारराजकीय बदलराजकीय बातम्याराज्य मंत्रिमंडळराज्य राजकारणराष्ट्रवादीराष्ट्रवादी अजित पवार गटशपथविधी सोहळाशिंदे गटशिवसेनाशिवसेना शिंदे गट

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago