Tembhurni - Latur Highway work begins, former MP Dr. Sunil Baliram Gaikwad's effort
मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची दिल्ली च्या डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती च्या कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती ( रजि.)दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी ( निधन स्थळ) २६ अलीपुर रोड दिल्लीच्या सर्वांगीण सम्मानासाठी विकासासाठी ही समिती १५ वर्षापूर्वी गठीत करून नोंदणीकृत केलेली आहे. सोबतच दलितांच्या उद्धारासाठी समितीच्या अंतर्गत “नॅशनल दलीत महापंचायत”(एन. डी. एम.) चे ही १५ वर्षापासून स्थापना केलेली आहे. या दोन्ही संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या सदस्य पदी माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांनी केलेल्या आज पर्यंतच्या सामाजिक कामाची ही पावतीच मिळाली आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड हे, १६ व्या लोकसभेत प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर लोकसभेत शपथ घेताना भारताच्या इतिहासात पहिल्यादाच शपथ घेतल्यानंतर लोकसभेच्या सभागृहात बुलंद आवाजात जयभीम चा जयघोष केलेले पहिले खासदार म्हणून त्यांची इतिहासात नोंद झालेली आहे. लोकसभेमध्ये दलितांसंदर्भात अनेक विषय मांडले. प्रामुख्याने भारत देशातील शासकीय वाचनालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी, अनुसूचित जाती जनजातीच्या अट्रोसीटीच्या कायद्यावर लोकसभेत केलेले भाषण, महाराष्ट्र मध्ये घडलेल्या दलीत अत्याचारावर शून्य प्रहार मध्ये लोकसभेत मांडलेले विषय, अशा लोकप्रतिनिधीच्या कार्याची दखल घेऊन डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती वर कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या समिती मध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉ सत्यनारायण जटीया, चरण सिंह आटवाल, केंद्रिय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,पी. एल पूनिया, डॉ उदित राज, टी एम कुमार, आत्माराम भाई परमार, राजेश बग्गा,वसंत बोले, डॉ कंवर सेन, पूर्व केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम, जयांतिभाई परमार, रामचरण गुजराती, मदनलाल सांखला, प्रकाश वर्मा, जोगेश्वर गर्ग, विनीत नागले, आदी देशातील आंबेडकरी चळवळीतील मान्यवर या समिती मध्ये आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…