इतर

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी २०१८ मध्ये २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१९ ला बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आणि सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले त्या कालावधीत राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या काळात हे काम बंद होते. सध्या हे काम नागपूरचीच एनआयटी ही संस्था करत असून या संस्थेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे. कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारा खर्च तसेच यंत्रसामग्रीसाठी खरेदी करण्यात येईल व लवकरात लवकर हे कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago