देश

एका तरुणीचं धक्कादायक कृत्य – एकाचवेळी सहा बॉयफ्रेंड्स, कॅफेमध्ये झाला थरार, व्हिडीओ व्हायरल

प्रेम आणि फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीनं एकाचवेळी सहा वेगवेगळ्या तरुणांशी प्रेमसंबंध ठेवले आणि अखेर या सर्व मुलांनी तिचा एकत्र सामना करत तिला जाब विचारला. हा थरारक प्रकार एका कॅफेमध्ये घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी वेगवेगळ्या वेळेस सहा मुलांना डेट करत होती. काही काळानंतर या मुलांना तिच्या फसवणुकीची कल्पना आली. त्यांनी एकत्र योजनेनुसार ठरवले आणि सर्वांनी एकाचवेळी कॅफेमध्ये तिच्यासमोर हजर होण्याचं ठरवलं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, ही तरुणी कॅफेमध्ये शांतपणे कॉफी पीत बसलेली असताना, एकामागून एक तिचे बॉयफ्रेंड्स तिथे येतात. अचानक एवढे सारे ओळखीचे चेहरे समोर आल्याने ती गोंधळून जाते आणि तोंड लपवू लागते. त्या तरुणांनी तिला फसवणुकीबाबत प्रश्न विचारले. संपूर्ण प्रकारांपैकी एकाने हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा व्हिडीओ @delhi_boyyss या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत ३.६ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. नेटकऱ्यांकडून या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण मुलीवर टीका करत असून काहीजण त्या सहा मुलांच्या समजुतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या घटनेनंतर ‘डबल डेटिंग’, ‘धोका’ आणि ‘फसवणूक’ या विषयांवर चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. सध्या तरी ही तरुणी आणि त्या सहा मुलांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago