man committed suicide after the woman filed a false complaint of rape
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 22 वर्षीय शुभम केशरवानी याने प्रेमविवाह केला होता, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात मृताने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शुभमच्या कुटुंबीयांनी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किडगंज येथे राहणारा २२ वर्षीय शुभम एका खासगी कंपनीत कामाला होता आणि त्याचे दारागंज भागातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 22 मार्च रोजी दोघे कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. त्यानंतर ३ एप्रिल रोजी चौक परिसरात असलेल्या आर्य समाज मंदिरात दोघांनी लग्न केले. लग्न झाल्यानंतर सोमवारी शुभम काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर शुभमने सोबतिया बाग येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांना समजले. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांना मृत व्यक्तीजवळ सुसाईड नोट आढळली, तिच्यात लिहिले होते कि, “माझ्या मृत्यूचे कारण माझी पत्नी आणि तिचे दोन प्रियकर आहेत. नीरज आणि संदीप अशी त्यांची नावे आहेत. दोघेही लग्नापूर्वी माझ्या पत्नीसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि हे माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मला आता जगायचे नाही.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…