देश

भयंकर! महिलेची ओढणी दुचाकीच्या साखळीत अडकली, हात निखळून झाला धडावेगळा…

उत्तर प्रदेश : झाशीमध्ये एक अतिशय भयंकर घटना घडली. महिलेची ओढणी दुचाकीच्या साखळीत अडकून तिचा हात धडावेगळा झाला. ही वेदनादायक घटना पाहून आजूबाजूला असलेले लोक हादरले. सध्या या महिलेला झाशी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरसरे, झाशी येथील रहिवासी जयराम अहिरवार हे सध्या आपल्या कुटुंबासह राजगड येथे राहतात. त्यांची मुलगी रक्षा हिची ओढणी दुचाकीत अडकून हा अपघात झाला. रक्षा हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. रक्षाला ५ महिन्यांची मुलगी आहे. रक्षाचा पती वासुदेव यांनी सांगितले की, भाऊबीजेच्या दिवशी त्याची पत्नी राजगड येथील तिच्या माहेरी गेली होती. येथे त्यांची मुलगी आजारी झाली. त्यामुळे आपल्या मुलीच्या उपचारासाठी रक्षा तिची आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. घरापासून काही अंतरावर असलेल्या हंसारी ते राजगड दरम्यान ते पोहोचले असता, अचानक दुचाकीच्या चेनमध्ये रक्षाची ओढणी अडकली. यानंतर सगळे खाली पडले. ओढणी दुचाकीमध्ये इतकी अडकली होती की रक्षाचा हात दुचाकीमध्ये अडकला आणि धडावेगळा झाला. यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहन चालवताना किंवा वाहनात बसताना काळजी घेणे किती गरजेचे आहे, हे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. पोलिस अधीक्षक रामवीर सिंह यांनी सांगितले की, दुचाकीमध्ये ओढणीसह हात देखील अडकल्याने महिलेचा हात वेगळा झाला. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला. जर स्त्रीने साडी नेसली असेल तर ती सांभाळा. तुम्ही कार चालवत असाल तर सीट बेल्ट लावा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago