देश

शाळकरी मुलांना आणि शिक्षकांना घेऊन जाणारी बस KSRTC बसला धडकली, 9 जण ठार तर 38 जखमी

केरळ : शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जाणारी पर्यटक बस केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसला आदळून भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वडाक्केंचेरी येथे अपघात झाल्यानंतर बस दलदलीत पडल्याने नऊ जण ठार आणि 38 जखमी झाले. मृतांमध्ये KSRTC बसमधील पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे.

वृत्तानुसार, राष्ट्रीय महामार्ग 544 वर बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. केरळचे मंत्री एमबी राजेश यांनी याबाबत पुष्टी केली. टुरिस्ट बस एर्नाकुलममधील बसेलिओस विद्यानिकेतन सीनियर सेकेंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन उटीकडे जात होती तर KSRTC सुपरफास्ट बस कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात होती. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसला पलक्कड जिल्ह्यातील वडक्केंचेरी येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर ३८ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, जखमींना उपचारासाठी जवळच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago