The young man killed his own mother and burned her body in the yard
झारखंडमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जोजोगुट गावात एका माथेफिरू तरुणाने त्याच्या आईची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह अंगणातच जाळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने अंगणातच तिचा मृतदेह जाळला. त्याच्या लहान भावाच्या पत्नीने या घटनेची माहिती शेजाऱ्यांना आणि इतर ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला मारहाण करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांची हत्या केल्याचा आरोप देखील या तरुणावर करण्यात आला होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…