देश

ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीत समाविष्ट झाला पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द

ऑक्सफोर्डने आपल्या हिंदी शब्दांमध्ये आणखी एक नवीन शब्द जोडला आहे. तो शब्द आहे ‘आत्‍मनिर्भरता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी जेव्हा देश कोरोनाच्या विळख्यात होता आणि त्यावर मात करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले जात होते, त्यावेळी या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्‍मनिर्भर बनवण्याविषयी नमूद केले होते.

जानेवारी 2020 मध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या नवीन आवृत्तीत 26 हिंदी शब्दांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी २२ शब्द त्याच्या मुद्रित आवृत्तीत समाविष्ट करण्यात आले होते, तर इतर चार शब्द डिजिटल आवृत्तीत समाविष्ट करण्यात आले होते. त्यात असे शब्द होते जे सामान्य भारतीय लोक त्यांच्या बोलण्यात वापरतात. हे सगळे शब्द मिळून या शब्दकोशातील दहाव्या आवृत्तीत 384 शब्द समाविष्ट केले गेले, जे भारतातील सामान्य लोक संभाषणासाठी वापरतात.

‘आत्‍मनिर्भरता’ हा भारतीय शब्द ऑक्सफोर्ड डिक्शनरीत समाविष्ट झाल्यानंतर भारतीय शब्दांना महत्त्व दिलं जाणं स्वाभाविक आहे. या शब्दाची निवड सल्लागार मंडळामध्ये सहभागी असलेल्या भाषा तज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांनी केली आहे. जगभरात बोलल्या जाणार्‍या काही विशिष्ट भाषांमध्ये बोलल्या जाणार्‍या आणि नवीन प्रचलित शब्दांवर ऑक्सफोर्डची खास नजर असते. त्यानंतरच ऑक्सफोर्डकडून हे शब्द आपल्या नवीन आवृत्तीत समाविष्ट केले जातात. ऑक्सफोर्ड डिक्शनरी जगभरात प्रसिद्ध आहे आणि जगभरातील लोक नवीन शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी याचा वापर करतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago