The Only Survivor of Ahmedabad Plane Crash – Vishwas Kumar Ramesh Shares His Harrowing Experience
अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात सर्वत्र मृत्यूचे तांडव घडत असताना एकमेव प्रवासी जीवंत बचावले — विश्वास कुमार रमेश! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विश्वास यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
विश्वास कुमार रमेश हे एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या फ्लाईट AI171 मध्ये प्रवास करत होते. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या इकॉनॉमी क्लासमधील 11A क्रमांकाची खिडकीजवळची सीट त्यांची होती — जी आपत्कालीन बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ आहे.
अपघाताचा थरारक क्षण
“विमान धावपट्टीवर वेग घेत असताना काहीसं विचित्र वाटलं. पाच-दहा सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखं वाटलं आणि अचानक हिरव्या-पांढऱ्या दिव्यांची झळक दिसली. असं वाटलं की पायलट टेकऑफसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होता, पण काही क्षणांतच विमान थेट वसतिगृहाच्या इमारतीवर आदळलं,” असं विश्वास यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, ज्या भागात ते बसले होते तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. “कदाचित मी माझ्या सीटसह खाली पडलो आणि मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला असल्याने समोर काही जागा दिसताच मी बाहेर पळालो,” असं त्यांनी सांगितलं. “माझ्या डोळ्यांसमोर दोन एअर होस्टेस, एक काका-काकू आणि इतर अनेक प्रवासी जळून गेले. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती — कदाचित कोणीही तिथून बाहेर पडू शकले नाही,” असे त्यांनी अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी सांगितले.
अपघातात त्यांचा डावा हात गंभीर भाजला असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. “मी बाहेर आलो आणि काही सेकंदातच संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. जर मी काही क्षण उशिरा बाहेर पडलो असतो, तर मीही त्या आगीत अडकून गेलो असतो,” असे त्यांनी सांगितले.
फ्लाइट AI171 अपघाताचा मृत्यूतांडव
या भीषण अपघातात आतापर्यंत २६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सरकारी यंत्रणा मदतीसाठी सतर्क असून, अपघाताची चौकशी सुरू आहे.
विशेष म्हणजे, 11A ही सीट इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेतील असून ती आपत्कालीन दरवाज्याजवळ आहे. हीच जागा विश्वास कुमार रमेश यांना जीवनदान देणारी ठरली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…