नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 13313 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत ८.7 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत कोविडमुळे 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 83,990 वर पोहोचली आहे. कोविडची परिस्थिती चिंताजनक असलेल्या पाच राज्यांमध्ये केरळ (4224), महाराष्ट्र (3260), दिल्ली (928), तामिळनाडू (771) आणि उत्तर प्रदेश (678) रुग्णांचा समावेश आहे. एकूण नवीन प्रकरणांपैकी 74.07 टक्के प्रकरणे या पाच राज्यांमधून आली आहेत.
आत्तापर्यंत देशात कोविडमुळे पाच लाखांहून अधिक (5,24,941) मृत्यू झाले आहेत, तर गेल्या 24 तासांत 10,972 रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. भारतात सध्या कोविडचे 83,990 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…