Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
पाटणा : बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी आहे, मात्र विषारी दारूचा कहर काही संपत नाहीये. नुकतीच उघडकीस आलेली ही घटना छपरा येथील आहे, जिथे बनावट दारू प्यायल्याने प्रकृती बिघडल्याने एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भयावह बाब म्हणजे बनावट दारू प्यायल्याने त्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. मुकेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव असून तो पनापूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोर्हा गावचा रहिवासी आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने जवळच्या गावात एका लग्नाच्या कार्यक्रमात दारू प्यायली होती, त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्यानंतर अचानक या व्यक्तीची दृष्टी गेली. त्याला पानापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला छपरा सदर रुग्णालयात नेण्यास सांगितले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डॉक्टरांनी मद्य प्राशन केल्याने प्रकृती बिघडल्याचे सांगितले आहे.
मुकेश ठाकूर याचे सलूनचे दुकान आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो सोमवारी जवळच्या गावात लग्नाला गेला होता, मात्र तेथून आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली. मंगळवारी त्याने अंधुक दिसत असल्याची तक्रार केली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे. दारू पिल्याने हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…