देश

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; दहशतवाद्याकडून गर्दीवर गोळीबार

ऑस्ट्रियामध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून यामधील एक हल्लेखोर आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाला आहे. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयिताला ठार करण्यात आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार केला जात होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली. ऑस्ट्रिया पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याच्या तयारीत असतानाच हा गोळीबार झाला. लॉकडाउन लागू होणार असल्याने बार आणि रेस्तराँमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. “इतर संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आलं आहे. शोध फक्त व्हिएन्नापुरता मर्यादित ठेवला जात नाही आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago