देश

ब्रेकिंग : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, कोर्टात तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केरळ-तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. कारण हा पॉलिसीशी संबंधित निर्णय आहे. अशा परिस्थितीत सरकार सध्या कुठलीही बाजू घेऊ शकत नाही.

तथापि, उत्तर देण्यासाठी सरकारकडे आठवड्याभराचा कालावधी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. सरकारने त्यांचे लेखी उत्तर तयार करुन ते कोर्टाला द्यावे. आता फक्त इंद्रा साहनी जजमेंटवर पुनर्विचार करण्याची गरज आहे की नाही, यावरच लक्ष केंद्रित केले जात आहे.

मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व राज्यांना विचारण्यात आलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढविली जाऊ शकते का? कारण याबद्दल घेण्यात येणाऱ्या निर्णयाचा परिणाम खूप व्यापक असू शकतो, त्यासाठी कोर्टाने प्रत्येक राज्याचे मत मागवले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

13 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago