suspicious husband stitches wifes private parts
उत्तर प्रदेश : रामपूरमध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे हात-पाय बांधून तिचे गुप्तांग तारेने शिवले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आरोपी तरूण मजुरीचे काम करतो. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तो घरातून कामासाठी बाहेर गेल्यावर पत्नी बाहेर फिरते आणि परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवते, असा संशय त्याला येत होता. यावरून तो पत्नीला मारहाण देखील करत होता.
संशयाने डोक्यात घर केल्यामुळे या महिलेच्या पतीने अतिशय भयानक कृत्य केले. महिला सकाळी ६ वाजता झोपलेली होती. यावेळी तिच्या नवऱ्याने तिला खोलीत बंद करून मारहाण केली. नंतर त्याने तिचे हात-पाय बांधले आणि तिच्या तोंडात कापड कोंबले. त्यानंतर या विकृत पतीने पत्नीचे गुप्तांग तारेने शिवले. महिला वेदनेने विव्हळत होती, त्यानंतर पतीने तिचे हायपाय सोडले आणि तेथून फरार झाला. मग या महिलेने तिच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली.
महिलेच्या घरचे तात्काळ तेथे पोहोचले आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारले. त्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…