देश

जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय, त्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालणे आणि त्याचे सहकाऱ्यांशी संबंध जोडणे क्रूरता – उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालणे आणि त्यानंतर कोणताही पुरावा सादर न करता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणे हे मानसिक क्रौर्य आहे, असे मत मांडले. न्यायमूर्ती व्ही एम वेलुमणी आणि एस सौन्थर यांच्या खंडपीठाने एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला, कारण त्याची पत्नी सतत त्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायची आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊनही तिने गोंधळ घातला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पती मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर असून पत्नी सरकारी शाळेतील शिक्षिका आहे. यांचे 10 नोव्हेंबर 2008 रोजी लग्न झाले होते आणि ते सुमारे अडीच वर्षापर्यंतच एकत्र राहिले होते. मात्र, ती सतत तिच्या पतीवर संशय घेत होती.

सुनावणीदरम्यान, पतीने निदर्शनास आणून दिले की पत्नीने 2011 मध्ये त्याला सोडताना तिची थाली चेन (मंगळसूत्र) काढून टाकली होती, जी विवाहित असल्याचे प्रतीक म्हणून स्त्रीने परिधान केलेली पवित्र साखळी आहे. खंडपीठाने म्हटले की, आम्ही म्हणत नाही की मंगळसूत्र काढून टाकणे हे वैवाहिक गाठ संपुष्टात आणण्यासाठी पुरेसे आहे, तथापि, न्यायाधीशांनी मत मांडले की पत्नीच्या या कृतीचे स्वतःचे महत्त्व आहे आणि हे दर्शविते की पक्षांचा वैवाहिक संबंध पुढे चालू ठेवण्याचा कोणताही हेतू नाही.

पत्नीने दावा केला की तिचा पती इतर महिला लेक्चरर्सशी बेकायदेशीर जवळीक करत होता आणि तो मध्यरात्रीपर्यंत त्यांच्याशी मोबाईलवर बोलत असायचा. दरम्यान, तिने स्थानिक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला तिच्या पतीबरोबर पुन्हा जुळवून घ्यायचे आहे आणि तिच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्यासोबत आनंदाने राहायचे आहे.

याप्रकरणी खंडपीठाने नमूद केले कि, महिलेने घाणेरडी भाषा वापरली आणि कॉलेजमधील विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत काम करणाऱ्या इतर महिला शिक्षक कर्मचाऱ्यांशी तिच्या पतीचा संबंध जोडला. आम्ही अंदाज लावू शकतो की पती ज्या महाविद्यालयात काम करत होता त्या महाविद्यालयात पत्नी गेली आणि तिने इतर कर्मचारी सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पतीचे इतर महिला शिक्षकांशी संबंध असल्याचे सांगत देखावा तयार केला आणि गोंधळ घातला. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(ia) नुसार, पत्नीचे हे कृत्य नक्कीच मानसिक क्रूरता आहे. आम्ही हे देखील जोडू शकतो की या कृत्यामुळे पतीच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रतिमेला नक्कीच गंभीर आणि भरून न येणारी इजा होईल.”

क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा हुकूम नाकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या पतीने दाखल केलेल्या अपीलावर कोर्टाने कारवाई केली आणि उच्च न्यायालयाने अपील मान्य करून पतीला घटस्फोट मंजूर केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago