देश

राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपींची सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने तुरुंगात दोन्ही दोषींची वागणूक समाधानकारक असल्याचे सांगत आणि ते बराच काळ तुरुंगात होते हे लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याचा आदेश दिला.

न्यायालयाने नमूद केले कि, “नलिनी तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात आहे आणि तिची वागणूक देखील समाधानकारक आहे. तिने कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये पीजी डिप्लोमा केला आहे. रविचंद्रनचे आचरण देखील समाधानकारक असल्याचे आढळून आले आहे आणि त्यांनी तुरुंगवासात विविध अभ्यास केले आहेत ज्यात कला विभागातील पीजी डिप्लोमाचा समावेश आहे. त्याने चॅरिटीसाठी विविध रक्कम देखील गोळा केली आहे.” त्यामुळे त्यांची याचिका मान्य करून त्यांच्या सुटकेचे निर्देश दिले. अशा प्रकारे अर्जदारांना इतर कोणत्याही प्रकरणात दोषी नसल्यास सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रकरण निकाली काढण्यात आले, असे आदेशात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी एजी पेरारिवलन याची १८ मे रोजीच चांगली वर्तवणुक असल्याचं नमूद करत सुटका केली आहे. त्यानंतर नलिनी आणि रविचंद्रन यांनी हाच दिलासा मिळावा म्हणून जूनमध्ये मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि, भारतीय संविधानाच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयासारखे अधिकार आपल्याकडे नाहीत असे सांगून उच्च न्यायालयाने यावर विचार करण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.

२१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या

२१ मे १९९१ रोजी निवडणुकींच्या प्रचार रॅलीदरम्यान तामिळनाडूमध्ये आत्मघाती हल्ला घडवून राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पेरारिवलनसह ७ जणांना आरोपी म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. टाडा कोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दयेचा अर्ज स्वीकारत फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago