Congress leader Sonia Gandhi infected with corona
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे, याबाबत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
जयराम रमेश यांनी ट्विट केले, “काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची आज कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सरकारी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये राहतील.”
2 जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचवेळी, बुधवारी प्रियांका गांधीही कोरोना संसर्गाच्या विळख्यात आल्या. त्या सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. याआधीही प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. ३ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.
तेजस्वी यादव यांची कालच भेट
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कालच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी सीताराम येचुरी यांचीही भेट घेतली. त्यानंतर आता सोनिया गांधी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…