देश

विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत, दोन जण गंभीर

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील एक तरुण पाणी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये उतरला होता, त्यावेळी त्याला करंट बसल्याचे घरातील लोकांनी पाहिले. मात्र, ऐनवेळी मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तरुणाला वाचविण्याच्या प्रयत्नात या तरूणासह कुटुंबातील सहा सदस्यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महुआ-झाला येथील रहिवासी लक्ष्मण अहिरवार यांच्या घरात ही घटना घडली आहे. त्यांच्या घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये अंधार पडत असल्यामुळे त्यांनी टाकीमध्ये उजेड पडण्यासाठी लाईट लावून प्रकाशाची व्यवस्था केली होती. जेणेकरून टाकीतून पाणी काढताना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, आज सकाळी आठ वाजता कुटुंबातील एक तरुण पाणी काढण्यासाठी टाकीमध्ये उतरला होता, तेव्हा त्याला तीव्र करंट बसला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला अशा अवस्थेत बघितल्यामुळे घाबरून त्यांनी त्या युवकाला पकडून खेचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बाकीच्या सदस्यांना देखील विजेचा धक्का बसला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

या घटनेत लक्ष्मण रमुआ अहिरवार (वय 55), रामप्रसाद हल्ली अहिरवार (वय 30), शंकर हल्ली अहिरवार (वय 35), मिलन अहिरवार (वय 25), नरेंद्र जगन अहिरवार (वय २०), विजय जगन अहिरवार (वय 20) यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago