देश

आग्रा-लखनौ मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यात आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर अतिशय भीषण अपघात झाला आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे कारची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले सर्वजण मेहंदीपूर येथील बालाजी मंदिरात जात होते. रात्री एक वाजता तालग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

चालकाला डुलकी लागल्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. यूपीडाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या सर्वांना मेडिकल कॉलेजमध्ये नेले. त्यांच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटवून पोलिसांनी घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. हे सर्वजण लखनौच्या काकोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधडिया गावातील रहिवासी होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago