मनोरंजन

मोठी बातमी! गायक केके यांच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा, गुन्हा दाखल

कोलकाता : गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्याबाबत पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. केके यांचे पोस्टमॉर्टम कोलकाता रुग्णालयात होणार आहे. त्याचबरोबर केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा मिळाल्यानंतर आता पोलीस हॉटेल कर्मचारी आणि आयोजकांची चौकशी करू शकतात.

गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस केके यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांच्या संमतीनंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केले जाईल. एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह केके यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे. पोलीस सध्या पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत.

प्रसिद्ध गायक केके (कृष्णकुमार कुननाथ) यांचे निधन झाले. केके पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते, त्यानंतर त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती मिळाली होती. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

केके यांच्या निधनानंतर गायिका श्रेया घोषाल भावूक झाली आणि म्हणाली की, मला धक्का बसला आहे. केके आता आपल्यात नाहीत हे स्वीकारणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. यावेळी त्याच्या कुटुंबाला किती वेदना होत असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago