Sidhu set to go to jail, Chief Justice denies relief
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना आता रोड रेज प्रकरणी तुरुंगात जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी क्युरेटिव्ह याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. सिद्धू यांना आता कोर्टात शरणागती पत्करावी लागणार आहे, अन्यथा पंजाब पोलिस त्यांना अटक करतील.
तत्पूर्वी, सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एएम खानविलकर म्हणाले की, आम्ही हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवत आहोत, ते त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतील. सिद्धू यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयाकडे एक आठवड्याची मुदतवाढ मागितली होती. सिद्धू यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली नाही तर 10 जुलैपर्यंत त्यांना दिलासा मिळणार नाही. कारण न्यायालयाला 23 मे ते 10 जुलैपर्यंत उन्हाळी सुट्टी आहे. या दरम्यान, फक्त तातडीच्या प्रकरणावर सुनावणी केली जाते.
सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश प्रथम पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचणार आहे. तेथून त्यांना पटियालाच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाठवण्यात येणार आहे. सिद्धू यांनी स्वत: आत्मसमर्पण न केल्यास, संबंधित पोलिस ठाण्याला त्यांना अटक करण्यास सांगितले जाईल.
काय आहे संपूर्ण प्रकरण
क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे काय?
क्यूरेटिव्ह पिटिशन हा कोणत्याही दोषी व्यक्तीला दिलासा देणारा शेवटचा स्रोत असतो. यामध्ये सर्वोच्च न्यायालय कलम 142 चा वापर करते. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने या कलमाचा वापर सपा नेते आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी आणि राजीव गांधी हत्येतील दोषीला सोडण्यासाठी केला होता. यामध्ये सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रलंबित प्रकरणावर आपल्या अधिकाराचा वापर करून निर्णय देते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…