देश

शरद पवारांच्या भाषणाची पुनरावृत्ती अमेरिकेतही, भर पावसात जो बायडन यांचं भाषण

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले असताना अमेरिकेत सध्या जो बायडन यांच्या ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

फ्लोरिडामधील सभेत भर पावसात भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेत सध्या पोस्टल आणि ई-मेलद्वारे मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे तीन नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या निवडणुकीत फ्लोरिडा हे महत्त्वाचे राज्य ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी जोर लावला आहे.

बायडन सभेत भाषण करत असताना पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र, बायडन यांनी सभेत भाषण सुरूच ठेवले. त्यांची ही सभा ‘रॅली ड्राइव्ह इन’ होती. या सभेला हजर असणारे कारमध्ये बसून भाषण ऐकत होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली होती. काही नेटकऱ्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली. त्यांनी त्याची तुलना करताना बायडन त्या विजयाची पुनरावृत्ती करतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना बायडन उपराष्ट्रपती होते.

वर्षभरापूर्वी सातारा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील भर पावसात सभा घेतली होती. त्याचा राज्यातील निवडणूक प्रचारावर मोठा प्रभाव पडला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago