Serum Institute CEO Adar Poonawala named Asian of the Year
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं वृत्तपत्र ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना विरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.
वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिल्या जाणाऱ्या ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला आणि याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही या यादीत समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे.
‘दी स्ट्रेट्स टाइम्स’च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, “आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…