देश

रेडमी स्मार्टफोनचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू, झोपताना उशीखाली ठेवला होता फोन

Redmi 6A Blast : स्मार्टफोनला आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सहसा फोनचा स्फोट किंवा आग लागल्यावर कोणीतरी जखमी झाल्याची बातमी येते, मात्र यावेळी स्मार्टफोनच्या स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्फोट Redmi 6A स्मार्टफोनमध्ये झाला आहे. टेक YouTuber MD Talk YT ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

YouTuber MD Talk YT च्या दाव्यानुसार, त्याची मावशी रात्री तिचा Redmi 6A फोन उशीखाली ठेऊन झोपली होती. मध्यरात्री अचानक फोनचा मोठा आवाज झाला आणि त्यात त्याच्या मावशीचा मृत्यू झाला. YouTuber ने या फोनचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दिसत आहे की फोनचा मागील पॅनल पूर्णपणे खराब झाला आहे. पलंगावर रक्त पसरलेले असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

या अहवालावर Xiaomi ने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि या दुःखाच्या वेळी पीडितेच्या कुटुंबासोबत आहेत. Xiaomi ने असेही म्हटले आहे की ते पीडितेच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करतील. YouTuber ने Xiaomi चे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांना देखील फोनच्या फोटोसह टॅग केले होते. तथापि, या प्रकरणी पोलिसात तक्रार केलेली आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ प्रतिक्रिया देताना, Xiaomi ने म्हटले आहे की हे प्रकरण खूप गंभीर आहे, कारण ग्राहकांची सुरक्षा ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे. सुरुवातीला हे बॅटरी डॅमेज झाल्याचे प्रकरण दिसत आहे, परंतु कंपनीकडून अद्याप असे कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. भारतात फोन स्फोटाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक फोनला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago