देश

गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात, जाणून घ्या LPG सिलिंडरचे नवीन दर…

नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत 36.50 रुपयांनी कमी झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली आहे.

घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक वापरासाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत तेल कंपन्या ठरवतात. कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांच्या आधारे निर्धारित केल्या जातात.

व्यावसायिक LPG सिलिंडरचे नवीन दर 

  • दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर २०१२.५० रुपये होती.
  • कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर २१३२ रुपये होती.
  • मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता.
  • चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

कोणाला फायदा होईल?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत
विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती आज ना महाग झाल्या आहेत ना स्वस्त झाल्या आहेत. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर नजर टाकली तर ते 1000 रुपयांच्या पुढे राहिले आहेत. दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत असून त्याच्या किमतींवर कोणताही दिलासा नाही.

19 मे पासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चौथ्यांदा कपात करण्यात आली आहे. दरम्यान, घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago