देश

पोलिसाच्या मुलाने आईच्या खात्यातून चोरले 36 लाख रुपये, मोबाईल गेमचे व्यसन पडले महागात…

हैदराबाद : एका दिवंगत पोलिस कर्मचाऱ्याच्या 16 वर्षांच्या मुलाने इंटरनेट गेमिंगवर पैसे उधळण्यासाठी त्याच्या आईच्या SBI आणि HDFC खात्यातून 36 लाख रुपये चोरले. हा मुलगा हैदराबादच्या अंबरपेट भागात राहतो. त्याने आजोबांच्या मोबाईलवर शूटिंग गेम डाउनलोड केला होता.

गेमच्या ऍप-मधील खरेदीसाठी त्याने प्रथम त्याच्या आईच्या खात्यातून 1,500 आणि 10,000 रुपये चोरले. हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार त्याला नंतर या गेमचे व्यसन लागले. हा मुलगा दिवंगत पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तो 11वीत शिकतो. पोलिसांनी सांगितले की त्याने 1.45 लाख ते 2 लाख रुपये पेमेंट केले.

मुलाची आई तिच्या एसबीआय खात्यातून पैसे काढण्यासाठी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तिच्याकडे जवळपास २७ लाख रुपये होते. तिला मोठा धक्का बसला, तिला कळले की संपूर्ण पैसे तिच्या नकळत काढून घेतले गेले. त्यानंतर तिने एचडीएफसी खाते तपासले असता 9 लाख रुपये काढल्याचे आढळले. त्यानंतर महिलेने सायबर क्राईम युनिटशी संपर्क साधला. पतीच्या मृत्यूनंतर मिळालेली भरपाई दोन खात्यांमध्ये जमा झाली होती, असे या महिलेने सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago