Poet Kunwar Bechain dies due to Corona
नवी दिल्ली : प्रख्यात कवी कुंवर बेचेन यांचे आज (२९ एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता आणि त्यांच्यावर नोएडा येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसिद्ध कवी डॉ कुमार विश्वास यांनी ट्वीटरवर ही माहिती शेअर केली.
कुंवर बेचेन आणि त्यांची पत्नी संतोष कुंवर या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. या दोघांचा कोरोना अहवाल 12 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोघांनाही दिल्लीच्या लक्ष्मीनगर येथील सूर्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर आहे. मात्र कुंवर यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना आनंद विहार येथील कॉसमॉस रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळताच कुमार विश्वास यांनी आपल्या ओळखीतल्या सर्व डॉक्टरांकडे मदत मागितली पण कोठूनही मदत मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर मदत मागितली, तेव्हा नोएडाच्या कैलास रुग्णालयाचे मालक डॉ. महेश शर्मा यांनी त्यांना मदत देऊ केली आणि त्यांना रूग्णालयात बेड मिळाला. परंतु, आज अखेर कुंवर बेचेन यांची प्राणज्योत मालवली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…