Padma Shri Dr. KK Agarwal
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दिल्लीतील एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्यांना एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते.
कोरोना काळातही त्यांनी जनतेला शिक्षित करण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि असंख्य व्हिडिओ आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे 100 दशलक्षांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचले आणि असंख्य लोकांचे जीव वाचले, ”असे निवेदनात म्हटले आहे. कोरोना कालावधीत डॉ.के.के.अग्रवाल यांनी हजारो लोकांना मदत केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. २०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे, डॉ. केके अग्रवाल हे तेच डॉक्टर आहेत, ज्यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना कोरोनाची लस घेताना त्यांना सोबत न घेतल्याबद्दल फोनवर फटकारले होते. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात ही घटना घडली होती. यावेळी डॉ. केके अग्रवाल कोरोना लसीबद्दल टीव्हीवर लाइव्ह बोलत होते आणि तेव्हाच त्यांच्या पत्नीचा फोन आला आणि त्यांच्या पत्नीने त्यांना फटकारण्यास सुरवात केली. डॉ. केके अग्रवाल यांनी त्यांच्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला, तथापि, तिने ऐकण्यास नकार दिला होता. त्यांची पत्नी म्हणत होती की लस घ्यायला तुम्ही एकटे का गेलात, मला बरोबर का नेलं नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…