Avoid these mistakes while using mobile
मुंबई : देशभरात अनेक बनावट अॅप्स सापडली आहेत, ज्यामुळे मोबाईल यूझर्सला लॉटरीच्या नावाखाली फसवणूक होण्याचा धोका आहे. लॉटरी अॅप्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक बनावट अॅप्स उघडकीस आले आहेत. केरळमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. केरळ पोलिसांनी गूगल आणि मेटाला नोटीस बजावली असून, गूगलला 60 फेक लॉटरी अॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
न्यूज एजन्सी पीटीआयच्या अहवालानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे फेसबुक, वॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवरून मोबाईल यूझर्सना ऑनलाइन लॉटरीसंबंधीत मेसेज पाठवले जात आहेत. यामध्ये यूझर्सला 40 रुपये खर्च करून 12 कोटी रुपये जिंकण्याचे आमिष दिले जात आहे. यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर 40 रुपये पाठवून लॉटरी तिकीट मिळवावे लागते. पैसे पाठवताच तुम्हाला लॉटरीचे तिकीट मिळते, पण हे तिकीट बनावट असते. त्यानंतर तुम्हाला लॉटरी जिंकल्याचा मेसेज येतो. पीडितांनी सांगितले की, त्यांना 5 लाख रुपये जिंकल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर GST आणि स्टॅम्प ड्यूटीच्या नावाखाली मोठ्या रकमेची लूट केली जाते.
तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज मिळाल्यास आणि तुम्ही फसवणुकीचा शिकार झाला असाल, तर तुम्ही त्वरित 1930 या नंबरवर कॉल करून तक्रार करावी. तसेच, अशा मेसेज आणि कॉल्सकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
गूगलने आर्थिक फसवणुकीत सामील असलेल्या बनावट अॅप्सला गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गूगलने नवीन गूगल प्ले स्टोअर पॉलिसी लागू केली आहे. गूगलने बनावट लॉटरी अॅप्स हटवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, नवीन धोरणांतर्गत लो क्वॉलिटी आणि वित्तीय फसवणूक करणाऱ्या अॅप्सवरही कारवाई सुरू केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…