old man got angry due to snake bite in bihar nalanda said how dare you and was chewed
बिहार : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीला साप चावला, त्यानंतर नशेत असलेल्या त्या वृद्धाने सापाला चावून चावून मारून टाकलं. त्यानंतर या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला. रामा महतो (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो नालंदाच्या चंडी पोलीस स्टेशन परिसरातील माधोपुर डीह गावचा रहिवासी होता. सर्पदंशाने मृत्यू झाल्याची एफआयआर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी माधोपूर बाजारपेठेतून परतल्यानंतर रामा महतो त्यांच्या घराच्या दाराजवळ बसले होते, त्याचवेळी एक सापाचे पिल्लू (पोवा) रामा महतोला चावले. मात्र नशेत असलेल्या महतोने त्या सापाला पकडले आणि त्याला जाब विचारला की मला चावण्याची तुझी हिम्मत कशी झाली? त्यानंतर तू मला चावला, आता मी तुला चावेन, असे म्हणत रामा महतो याने सापाला चावण्यास सुरुवात केली. चावत असताना सापाने रामा महतोला तोंडात अनेक ठिकाणी दंश केला. यामुळे रामा महतोच्या तोंडातून रक्त देखील आले होते. परंतु, त्यांनी सापाला चावून चावून मारून टाकले. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही, त्यांनी मृत सापाला घराजवळील एका लहान झाडाच्या फांदीवर लटकवले आणि झोपायला निघाले.
कुटुंबीयांनी रामा महतोला उपचार घेण्यास सांगितले. पण रामा महतो म्हणाले की तो साप लहान होता, त्यामुळे विषाचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हणत त्यांनी विषय टाळला. मग कुटुंबीयांनीही जास्त आग्रह केला नाही. रविवारी सकाळी रामा महतो उठले नाही तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु त्यांचा मृत्यू झालेला होता. पोलीस ठाण्यात त्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…