देश

कोरोनाचे कितीही अवतार आले तरी मला काही होणार नाही, मला लसीची गरज नाही – रामदेव बाबा

मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा म्हणाले, “मी वृत्तवाहिनीवर जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे कितीही अवतार आले तरी मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे.”

रामदेव बाबा पुढे म्हणाले, “२०२१ मध्ये सर्वसामान्य लोकांना लस मिळणे अशक्य आहे. ही लस औषध नसून प्रतिबंधक लस आहे. मी लसीचा विरोध करत नाही पण अद्याप हे समोर आलेलं नाही की लस सहा महिन्यानंतर किती प्रतिकारशक्ती राखून ठेवते. मात्र, योगासनं केल्यास प्रतिकारशक्ती कायमच राखली जाईल.”

कोरोनाला घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. बाकी जे सरकार आणि औषध कंपन्या करतील त्याचे परिणाम लवकरच समोर येतील आणि सर्वकाही चांगलं व्हावं, अशी माझी इच्छा आहे, असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago