देश

ब्रेकिंग! राहुल गांधींना मोठा धक्का, मोदी आडनाव प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच राहुल गांधी यांनी केलेली शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’बाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. चार वर्षांनंतर 23 मार्च रोजी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द
यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राहुल यांचे संसद सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केले. राहुल केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरतात.

राहुल यांनी केल्या होत्या दोन याचिका
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल यांनी २ एप्रिल रोजी सुरत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. राहुल यांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिल्या अर्जात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती, तर दुसऱ्या अर्जात अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.

राहुल यांच्याकडे आता कोणता पर्याय आहे?
राहुल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मात्र, सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर अजूनही खुला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांचे सदस्यत्व बहाल केले जाऊ शकते.

काय आहे प्रकरण?
राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी, सर्वांचे मोदी हे आडनाव का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या या विधानाबाबत कलम 499, 500 अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. 2019 च्या निवडणूक रॅलीत राहुल यांनी सर्व चोरांचे मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली, असा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago