new road safety rules two wheelers helmet mandatory childrens riding
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना हे नियम लागू होतील. 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक असेल. तसेच दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा, असे या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. या नवीन वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड होऊ शकतो तसेच तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.
सेफ्टी हार्नेस हलके, जलरोधक आणि गादीयुक्त असावे. ज्यामध्ये मूल विश्रांती घेऊ शकतील. तसेच त्याची क्षमता 30 किलोपर्यंत भार सहन करण्याची असावी. अद्याप बीआयएसने (BIS) लहान मुलांच्या हेल्मेटसाठी स्वतंत्र मानक जारी केलेलं नाही. तोपर्यंत लहान मुलांसाठी सायकल हेल्मेटचा वापरता केला जाऊ शकतो. सरकारने 25 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा रस्ता सुरक्षेसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम (CMVR), 1989 मध्ये सुधारणा करण्यासाठी ही मसुदा अधिसूचना आणली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…