National Ex Finance Minister P Chidambarams Son Karti house raided by CBI
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्या घरावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त सीवागंगई आणि चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयचा हा छापा मनी लाँड्रिंग प्रकरणात टाकण्यात आला आहे.
चिदंबरम यांच्या मुलावर अनेक खटले सुरू आहेत. यामध्ये INX मीडियाला FIPB (फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड)ची मंजुरी मिळण्याच्या प्रकरणाचा समावेश आहे, जे सुमारे 305 कोटी विदेशी निधीशी संबंधित आहे. चिदंबरम अर्थमंत्री असतानाची ही घटना आहे. त्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या 7 ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. चिदंबरम यांच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तामिळनाडू येथील कार्यालयांवर आणि घरांवर कारवाई सुरू आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तपास यंत्रणेने कार्तीविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे जो परदेशातून मिळालेल्या पैशाशी संबंधित आहे. हे पैसे 2010-14 या कालावधीत मिळाले, अशी माहिती आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…